भरधाव कंटेनरने ज्येष्ठाला चिरडले

फरार चालक रत्नागिरी येथून ताब्यात

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा- पत्रादेवी येथे झालेल्या भीषण अपघातात सावळवाडी येथील नारायण सहदेव सावळ (६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरूवारी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सावळ गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

अपघातानंतर वाहनचालक मोहम्मद अजीम खान (वय २५, रा. उत्तर प्रदेश) हा (एमएच १२ व्हीटी ७०४८) कंटेनर घेऊन फरार झाला. माहिती मिळताच मोपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरचा तपास सुरू केला. हा कंटेनर रत्नागिरी-लांजा येथून ताब्यात घेतला. अपघातात ठार झालेले नारायण सावळ हे वास्को येथील कंपनीतून निवृत्त झाले होते. मोपा पोलिसांनी २८१, १०६ (१) १३४ एबी मोटर कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे.

error: Content is protected !!