कुडाळ : ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या माध्यमातून गावातील अंगणवाड्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. या वस्तूंमध्ये स्वच्छतेचे साहित्य, टीव्ही, स्पीकर, पेन ड्राईव्ह, स्टॅबिलायझर, मुलांसाठी खाऊ आदींचा समावेश आहे.
यावेळी सरपंच वेदिका दळवी, ग्रामविकास अधिकारी कोकरे मॅडम,उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाटकर, नाईक भाऊजी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व कर्मचारी वृंद उपस्थित होते.