माडखोल-धवडकी येथे कार व दुचाकी यांच्यात अपघात

तिघे गंभीर जखमी

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल-धवडकी येथील रूना हॉटेलजवळ आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डंपर आणि गुंडाई वेर्णा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, युंडाई वेर्णा कार ही बेळगावच्या दिशेने वेंगुर्ल्याकडे जात होती. माडखोल-धवडकी दरम्यान असलेल्या रूना हॉटेलजवळ पोहोचली असता, कारची समोरून येणाऱ्या डंपरशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये वेर्णा कारचे प्रचंड नुकसान झाले असून कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना कारमधून बाहेर काढून तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!