मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे टेम्पोचा अपघात

हायवेवर साचलेल्या पाण्यामुळे चालकाचा ताबा सुटला

​कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथील तुळसकर हॉटेलजवळ सोमवारी सायं. ५.४५ वाजण्याच्या सुमारास टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.

सदर टेम्पो कुडाळवरून ओरोसच्या दिशेने जात होता. दरम्यान, पावशी येथील तुळसकर हॉटेलजवळील महामार्गावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो महामार्गावर पलटी झाला.

या अपघातात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी नजीकच्या कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पावशी येथील तुळसकर हॉटेलसमोर पावसाचे पाणी साचते त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अपघात होण्याची संभावना असून या पाण्याचा योग्य तो निचरा व्हावा अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!