सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबीराचा समारोप मोठ्या थाटामाटात.

नाट्य प्रशिक्षणामुळे सिंधुदुर्ग ची नाट्य चळवळ अधिक सुदृढ होईल

सिंधुदुर्ग हि कलावंताचे आगार असुन अशा नाट्य शिबिरातुन दर्जेदार कलावंत घडतील आणि त्यातुन दमदार सादरीकरणातुन निश्चितच या कलावंताना भविष्यात व्यावसायिक कलावंत म्हणून नाटक, सिनेमा, सिरीज मधून काम करता येईल आणि रोजगाराची नवी संधी मिळेल असे विचार अजयकुमार सर्वगौड यांनी मांडले. तर कणकवली मुख्य अधिकारी गौरी पाटील यांनी हि प्रशिक्षणे केवळ दहा दिवसा इतपतच मर्यादित न रहाता यांची कालावधी वाढणं गरजेचे आहे असं मत व्यक्त करताना या कलावंतांना दिले गेलेल्या प्रशिक्षणातून त्यांनी साकारलेल्या विविध भुमिका आणि सादरीकरण प्रभावी असल्याचे सांगत प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे कौतुक केले.


जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी अशा नाट्य शिबिरातुन सिंधुदुर्ग ची जिल्ह्यात नाट्य चळवळ अधिक बळकट होईल असा आशावाद व्यक्त केला.
जेष्ठ नाटककार आणि या प्रशिक्षण शिबीराचे प्रशिक्षक संभाजी सावंत यांनी या प्रशिक्षणाचा वापर दैनंदिन जीवनात करा असा विचार मांडले.तर दुसरे प्रशिक्षक व जेष्ठ रंगकर्मी निखिल हजारे यांनी आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करण्याचा सल्ला दिला.


या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ रंगकर्मी, लेखक निवृत्त गटविकास अधिकारी आणि शिबिराचे संयोजक विजय चव्हाण यांनी केले.शासनाने सिंधुदुर्ग ला नाट्य शिबीर दिलेबाबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे व संचालक विभीषण चवरे,विशेष धन्यवाद दिलेत.


तर शिवकालीन गुप्त हेराकरवी वापरल्या जाणाऱ्या करपल्लवी या भाषेचे प्रत्यक्षिक सहभागी प्रशिक्षणार्थी कडून करून घेत प्रा हरिभाऊ भिसे यांनी रसिकांची मने जिंकली.


प्रशिक्षणार्थी कडून योगातून गणेश वंदना, एकपात्री अभिनय, मालवणी काव्य , दशावतार, मिमिक्री, राधानृत्य,मालवणी स्किट या बरोबर झम्पय नाटकातील एका प्रवेशाचे सादरीकरण ही करण्यात आले.या कार्यक्रम प्रमोद तांबे,श्रद्धा परब,प्रणाली चव्हाण, रिझवाना,दिपिका चव्हाण, प्रांजली पवार,नयन पवार, विठ्ठल राणे,अक्षय कासले, कीर्ती पाताडे, हेमंत समजिस्कर, शिवानी वर्दम, श्रीवदन आरोसकार, विघ्नेश मिराशी, श्रेणिक फडतरे, प्रीती गोसावी, आदी सह सर्व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
या दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबीरात सिंधुदुर्ग जिल्हा सह इतर जिल्ह्यांच्या हि नाट्य कलावंतानी उपस्थिती दर्शविली.

या समारोपीय कार्यक्रमासाठी योगशिक्षिका निता सावंत , कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, लोककला अभ्यासक प्रा हरिभाऊ भिसे
अक्षरसिंधुचे अध्यक्ष संजय राणे, सिनेकलावंत संजय
मालंडकर, ऋषिकेश कोरडे, अनेक रंगकर्मी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मंडळी, असंख्य विद्यार्थी आदी उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थिना सांस्कृतिक कार्यसचालनाललया प्रमाणपत्र देऊन सन्मानित करनेत आले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर आणि प्रणाली चव्हाण यांनी केले तर समारोप संजय राणे यांनी केले.

error: Content is protected !!