वर्धा: वर्धा शहरात पोलिसांना काही हॉटेलमध्ये गोमासाची बिर्याणी विकली जातं असल्याची माहिती मिळाली. यावरून वर्धा शहर पोलिसांनी काही हॉटेलची पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सोबत घेत तपासणी केली. यात पोलिसांना एका हॉटेलमध्ये बिर्याणीमध्ये चक्क गोमास दिलं जात असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल मालकाला अटक केलीय तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.वर्धेतील काही हॉटेलमध्ये गोमासयुक्त बिर्याणी विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासणी के पोलिसांनी चार हॉटेलची तपासणी केलीय. यात इतव बाजार येथील एक हॉटेल ‘अल बरकत’ येथे पोलिसांना पाच किलो गोमासयुक्त बिर्याणी आढळली. पोलिसांनी सदर बिर्याणी जप्त करून तपासणी साठी पाठवली आहे.
या प्रकरणी हॉटेल मालक कमर अली अमजद अली सय्यद (वय ३७, रा. बोरगाव, मेघे) याला अटक केलीय तर गोमास पुरवणारा फरीद कुरेशीचा पोलीस शोध घेत आहे. एका आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.