सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे निधन

सिंधुदुर्ग : सुप्रसिद्ध डबलबारी बुवा समीर कदम यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ओरोस येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

डबलबारी व भजन क्षेत्रातील एक नामांकित बुवा म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांनी आजवर अनेक भजने व डबलबाऱ्यांमध्ये सहभाग घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. त्यांचे जन्मगाव कुडाळ तालुक्यातील पोखरण असून सध्या ते पत्नी व मुलांसह कांदळगाव येथे वास्तव्यास होते.

त्यांच्या अकाली जाण्याने भजन आणि डबलबारी क्षेत्रावर शोककळा पसरली असून संपूर्ण जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे भजन क्षेत्रातला एक अनमोल तारा निखळला गेला आहे.

error: Content is protected !!