सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटन पर्व बैठक सावंतवाडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल, पिकुळेतील उबाठा शिवसेना, हेवाळे सरपंच साक्षी देसाई तसेच बांदा मंडलातील उबाठा शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब व शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली,निगुडे, शेर्ले, पानोसेवाडी, दांडेली, निरवडे व वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील शेकडो उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडून पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शतप्रतिशत भाजप व सदस्य नोंदणीच्या उद्दीष्टपुर्तीसाठी आवाहन राणे यांनी केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ भाजप सदस्य दादा मालवणकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप आदी उपस्थित होते.













