रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात २००० कापडी पिशव्यांचे वाटप

गणेशोत्सवानिमित्त दिला प्लास्टिकमुक्त कुडाळचा संदेश

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात २००० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्लास्टिकमुक्त कुडाळचा संदेश देण्यात आला.

प्लास्टिकच्या अति वापराला कुठेतरी आळा बसावा या हेतूने आजचा हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी कुडाळ एस. टी. स्टँड, पान बाजार व कुडाळ रेल्वे स्थानक येथील चाकरमान्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आली. ‘प्लास्टिकला नकार कापडी पिशव्यांचा स्वीकार’ असा संदेश यावेळी देण्यात आली. आपल्या कुडाळ शहराला प्लास्टिकमुक्त, हरित व सुंदर बनवण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात आले.

या उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, रो. गजानन कांदळगावकर, रो. राजन बोभाटे, रो. प्रमोद भोगटे, रो. प्रणय तेली, रो. राजीव बिले, रो. राकेश म्हाडदळकर, रो. राजीव पवार, रो. आनंद वेंगुर्लेकर, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे, नगरसेवक विलास कुडाळकर यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!