शनिवार दि.२५ जानेवारी.२०२५ नवराजहंस
नवराजहंस गृहनिर्माण संस्थेला रौप्य महोत्सवी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संस्थेने विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सकाळी श्रीदेव सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर स्पर्धा अर्थात खेळ पैठणीचा….!!’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.चौर विजेत्यांना चार पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. तमाम माताबहीणींच्या उपस्थितित कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.प्रसंगी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री.दीपक जाधव साहेब तसेच सेक्रेटरी सन्माननीय श्री. विद्याधर गावडे साहेब , खजिनदार श्री.दीपक चाळके उपस्थित होते.कार्यकारीणी सदस्य सन्माननीय श्री. संजय जाधव साहेब, जितेंद्र घडले, विकी नवले साहेब, सुनील कांबळे साहेब,सौ. विद्या खटमल,मेजर दिलीप मोरे उपस्थित होते.सायंकाळी मुलांचे विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रम रेकॉर्ड डान्स, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांचे, मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. तब्बल २५ वर्षांपूर्वी अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत अनेक संकटांना तोंड देत तत्कालीन सदस्यांच्या अथक परिश्रमाने आपली गृहनिर्माण संस्था उभी राहिली.तब्बल २५ वर्षांपूर्वी एक छोटंसं रोपटं होते पण आज विशालकाय वटवृक्षात रुपांतर झाले आहे पहिली सर्वसाधारण सभा २१ मे.२०००रोजी घेण्यात आली होती. सर्वानुमते तत्कालिन पहिल्या सर्व साधारण सभेचे अध्यक्ष श्री विलास लाडू सावंत म्हणून निवड करण्यात आली होती. सोसायटी नावारूपाला येण्यासाठी प्रचंड मेहनत आणि जीद्दीने अनेक अडथळ्यांना पायदळी तुडवून आपली संस्था दिमाखात उभी राहिली.आपल्या संस्थेचा सामाजिक पाया भक्कमपणे उभा करण्यासाठी आपल्या सोसायटीचे मुख्य प्रवर्तक श्री. रवींद्र आत्माराम साळवी आणि धडाडीचे कार्यकर्ते श्री.विष्णु कृष्णा गवस यांनी अहोरात्र मेहनत करून ऐक्याचे महामेरू निर्माण करुन आपल्या अमोघ वाणीने, जिव्हाळ्याने आपुलकीने एकत्र आणले. पुष्पाहारात जसा दोरा महत्त्वाचा असतो तो दोरा सर्व फुलांना एकत्रित गुंफून ठेवतो तेच कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं मावळयांना हाताशी घेऊन स्वराज्याचं तोरण बांधावे तसे या आधारस्तंभांनी आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. खूप मेहनतीने काम पूर्ण केले सोसायटीचे प्रमाणपत्र २४ मार्च२००० रोजी नोंदणीकृत प्रमाणपत्र देण्यात आले. सोसायटी स्थापन झाल्या झाल्यानंतर संस्थेचे पहिले नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री रवींद्र आत्माराम साळवी साहेब तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री विलास लाडू सावंत साहेब आणि सचिव म्हणून श्री. विष्णू कृष्णा गवस साहेब उपसचिव श्री.महादेव तबिब खजिनदार म्हणून श्री शांताराम गणपत घडशे यांची निवड करण्यात आली होती. तसेच कार्यकारणी श्री.मधुकर तुकाराम चाळके श्री.यशवंत गोविंद भाटे ,श्री.उत्तम रानोबा रोडे, श्री.विश्वनाथ आप्पा गाडे,श्री. मोहन भिकाजी सातपुते, वासुदेव पाटील तसेच सल्लागार म्हणून श्री.दोराबाजी जहांगीरजी चिन्नई यांना नेमण्यात आले होते या सर्वांनी मिळून या सोसायटीचे अधिकृत आदर्शवत नियमावली तयार करून या नियमावलीच्या आधारे ही सोसायटी आजपर्यंत उत्कर्षासाठी उन्नतीसाठी कार्यरत आहे. बँकेचे व्यवहार उपनिबंधकांचे व्यवहार व्यवहार महान मंडळींनी व्यवस्थितरित्या सांभाळले. सोसायटी आणि सोसायटीतील सभासदांना एकत्रित ठेवून एक मतांनी काम केले १६ जानेवारी २००१ रोजी पासून श्री विष्णू गवस तसेच श्री. शांताराम गोडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्री गणेशा सिद्राम व्हटकर यांची सचिव म्हणून तसेच श्री विजय बाळकृष्ण नवले यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली यांनी सुद्धा आपापल्या परीने सोसायटीला योग्य मार्गदर्शनखाली सोसायटीचे कामकाज पाहिले ३ जुलै.२०२४ ला नवीन कमिटी स्थापन करण्यात आली होती. या कमिटीमध्ये श्री रोडे साहेब अध्यक्षपद उपाध्यक्ष पद श्री.रवींद्र जाधव सचिव म्हणून श्री.प्रशांत पाटील उपसचिव म्हणून श्री विद्याधर गावडे तसेच खजिनदार म्हणून श्री.मधुसूदन चाळके उपखजिनदार म्हणून श्री.अशोक गणपत सुळेभावीकर
कार्यरत आहेत..













