कणकवलीत रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

पोलीस घटनास्थळी दाखल

कणकवली : साकेडी बौद्धवाडी दरम्यान कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून विजय उर्फ राजु लक्ष्मण साळसकर (38, साकेडी बौद्धवाडी) त्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेमध्ये मृतदेह छिंन्न, विछिंन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅक वर पडला होता. घटनेची माहिती मिळताच याबाबत रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. या दरम्यान कणकवलीच्या दिशेने जाणारी मंगला एक्सप्रेस साकेडी रेल्वे फटका मध्ये सुमारे एक तास थांबवण्यात आली होती. त्यानंतर साकेडी पोलीस पाटील शैलेश जाधव, यांच्यासहित आर पी एफ चे अनंत मोलसिंगरे, प्रवीण मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे ट्रॅक वर पडलेला मृतदेह बाजूला करून मंगला एक्सप्रेस मार्गस्थ केली. विजय साळसकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

ब्युरो न्यूज, सिंधू दर्पण, कणकवली

error: Content is protected !!