महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राची संस्कृती नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी! – निशिकांत कडुलकर युवक जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग

महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.

उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध!

कणकवली : उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत राजेंद्र कडुलकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र महिला लोकप्रतिनिधींबद्दल बोलताना सभ्यतेची आणि सन्मानाची मर्यादा पाळलीच पाहिजे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे महिला भगिनींचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान झाला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून, सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी कडुलकर यांनी केली आहे.

“महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.असा इशारा निशिकांत कडुलकर यांनी दिला आहे.राजकारणाचा स्तर इतक्या खालच्या पातळीवर नेणे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला महिलांचा आदर करण्याची मोठी परंपरा आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.असे निशिकांत कडुलकर म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे महिला भगिनींचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान झाला आहे.त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत राजेंद्र कडुलकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!