सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ व्यावसायिक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मानले अप्पर जिल्हाधिकारी यांचे विषेश आभार

व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) जेष्ठ व्यावसायिक भगवान कासले आणि लक्ष्मण महाडिक यांनी केले प्रथम वाचन

04/08/2026 च्या उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्या पत्राच्या अनुशंगाने दिनांक 05/08/2026 रोजी तत्परतेने कणकवली शहराच्या मुख्याधिकारी यांनी कणकवली बस स्थानका समोरच असलेल्या “विशाल साऊंड येथे किशन ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांच्या जवळ च हे पत्र पाठवले होते

यानंतर ते पत्र भरत बांदिवडेकर यांनी व्यापारी मित्र मंडळ येथे आणून ते भगवान कासले यांच्या जवळ सुपूर्द केले आणि ते वाचन सर्वांच्या अनुमतीने माऊली मित्र मंडळाचे सर्वेसर्वा श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांचे वाचन केले

त्या पत्रात असे नमूद केले आहे की, जा क्र कनप / न वि / 1067/ 2026 प्रति, श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर व इतर जुने भाजी मार्केट गाळे धारक व संबंधित सर्व व्यापारी, कणकवली

विषय – शासन मालकीच्या जागेवरील भाजी मार्केट पुनर्बांधणी व पुढील कार्यवाही बाबत

संदर्भ 1) मा सहाय्यक आयुक्त, नगरविकास शाखा सिंधुदुर्ग यांचे कार्यालयाकडील पत्र 14/07/2026
2) जूने भाजी मार्केट गाळे धारक व समस्त व्यापारी वर्ग कणकवली यांचे पत्र दिनांक 16/06/2026

उपरोक्त विषयांकित प्रकरणी नगरपंचायत हद्दीतील विद्यमान भाजी मार्केट इमारत ही अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे, काही जागा शासकीय मालकीची असल्यामुळे प्रस्ताव हा सक्षम प्राधिकरणाच्या ( शासन स्तरावर) मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे

तथापि सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करता, नवीन भाजी मार्केट इमारतीच्या बांधकामासंबधी आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही ही नगरपंचायत कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!