भेडशी: साटेली भेडशी सुतारवाडी येथील विवाहित तरुण कृष्णा उर्फ गिरी गोपाळ मयेकर वय वर्षे ५२ या तरुणाचा शेतात गवत जाळण्यासाठी घातलेल्या आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू होण्याची दुदैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. तो दुपारी घरी न आल्याने सायंकाळी पाच वाजता शोध घेण्यासाठी काही नातेवाईक गेले असता तो मृत अवस्थेत आढळून आला याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उशीरा पर्यंत पंचनामा सुरू होता कृष्णा मयेकर याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.साटेली भेडशी सुतारवाडी येथील कृष्णा मयेकर हा परमे रोड येथे लागून असलेल्या फटी धर्णे यांच्या मालकीच्या जमीनीत वाढलेल्या गवताला आग घालून जमीन साफसफाई करायला सांगितले होते. त्यामुळे दुपारी कृष्णा मयेकर हा शेत जमीन बागायती मध्ये आग लावून गवत जाळणे सुरू होते. मात्र दुपारची वेळ असल्याने वाऱ्यामुळे आग भडकली धूर तसेच आगीच्या ज्वाला यामुळे तो गुदमरून खाली कोसळला. आणी आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू झाला. यावेळी जवळपास कोणी नाही. शिवाय जमीन मालक देखील त्या ठिकाणी उपस्थित नव्हता.काही गवताचा भाग जळत शरीरा बरोबर येऊन अंगाचा काही भाग कपडे आगीत जळाले. तो आजुबाजूला आग पेटत होती. शेतात आग घालायला गेलेला गिरी घरी आला नाही म्हणून शोध घेण्यासाठी काही जण सायंकाळी शेतात गेले असता कृष्णा मयेकर हा शेत जमीनीत मृत अवस्थेत आढळून आला. या नंतर याची माहिती पोलीस पाटील तसेच दोडामार्ग पोलिसांना कळविली.

आगीत गुदमरून कृष्णा उर्फ गिरी मयेकर यांचा दुदैवी मृत्यू
1
/
97
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
1
/
97

Subscribe










