कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते कैलास अनिल यादव (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वेताळ बांबर्डे बुथ क्रमांक १७८ चे ते भाजपचे बुथ अध्यक्ष होते. त्यांच्यावर वेताळ बांबर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भाजपचे हरहुन्नरी आणि सर्वांना परिचित असणारे कैलास अनिल यादव हे १९ ऑक्टोबर रोजी आजारी पडले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयानंतर गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी त्यांना हलविण्यात आले. गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, मुलगा, दोन भाऊ, भावजया, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वेताळ बांबर्डे गावावर शोककळा पसरली आहे.