लांजा : नारळाच्या उंच झाडावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या त्या नेपाळी गुरख्याचा अखेर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना साटवली भंडारवाडी येथे घडली होती.राजापूर तालुक्यातील दसुर येथील काझी नामक व्यक्तीकडे गोविंद थापा नावाचा हा नेपाळी गुरखा त्यांच्या बागेत कामाला होता. तो १६ डिसेंबर रोजी साटवली येथील दूध डेअरीवर दूध घालण्यासाठी आला होता. यावेळी साटवली भंडारवाडी येथील एका व्यक्तीने त्याला नारळाच्या झाडावर नारळ काढण्यासाठी चढवले होते. मात्र तोल जाऊन त्याचा उंच झाडावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने प्रथम लांजा आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र या ठिकाणी त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला कोल्हापुर येथील सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या ठिकाणी उपचार सुरू असताना अखेर या नेपाळी गुरख्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता साटवली आंबा व्यापारी वर्गातून केली जात आहे.
नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या नेपाळी गुरख्याचा मृत्यू
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










