संचिता चव्हाण: माई शब्द उच्चारताच आईच्या मायेच्या स्पर्शाचा आभास झाला.सगळ्यांचा सांभाळ करणारी सगळ्यांना माया लावणारी,आपल्या ओंझळीतील प्रेम सगळ्यांना समान वाटणारी म्हणजे माई.
आमच्या आजीला प्रेमाने लोक माई म्हणायचे. जसं तीच नाव अगदी तशीच आमची आजी म्हणजे माय होती.लेकराला पान्हा आणि पाखराला दाना तिने कधीच चुकवला नाही.तिच्या मायेच्या पदरात आम्ही सगळी तिची नातवंडं कायम विसावलेली,तिच्या प्रेमळ स्पर्शाने आणि तिच्या सुरकुतलेल्या हातांनी भरवलेल्या घासाने आमचं बालपण अगदी सुखावह गेलं.आम्ही पाहिलेली आजी ही दानशूर होती,मनाने प्रेमळ तेवढीच खंबीर होती,पुस्तकी शिक्षणाने जारी साक्षर नसली तरी तिच्या अनुभवाची पोथी मोठी थोर होती.आजी म्हणजे खांगलेल्या मनाला मिळालेला खंबीर धीर होती.आजी आईच्या ममतेची सावली जणू…
संसाराचा रहाटगाडा आजोबंसोबत तेवढ्याच भक्कम हाताने पुढे घेऊन जाणारी आजी आम्हाला कधी कधी आजोबांना मिळालेला मजबूत दुवा वाटायची.लोक तर तिला पुरुषा सारखी खंबीर माई असं म्हणायचे.संकट कुठलही असो आजी त्याला न डगमगता भिडायची . नात्यांमधील समज गैरसमजुतीचा गुंता ती आपल्या अनुभवी आणि तितक्याच परखड विचारांनी अगदी सहज सोडवायची.
घरी आलेल्या याचकाला कधी तिने रिकाम्या हाताने पाठवलं नाही..स्वतःची लेकर भुकेली राहिली तरी शेजाऱ्याच्या रडवेल्या पाखराला तिने कधी उपाशी पोटी झोपू दिलं नाही.
दिवसभराच्या कामानंतर जेव्हा शिणलेलं मन आजीच्या मांडीवर विसावत आणि ती तिचा प्रेमळ हाथ डोक्यावरून फिरवत अगदी मायेने काळजीने जेव्हा ती विचारपूस करते तेव्हा मिळणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही जगातल्या कुठल्याच पुस्तकात सापडणार नाहीत.तिच्या अनुभवाची शिदोरी नेहमीच आमच्या अस्वस्थ मनाला शांत करायची.आजी अगदी साधी भोळी भाबडी माझी माई..नऊवारी साडी डोक्यावर मोठा कुंकवाचा टिळा , गोबरे गाल,देखणे डोळे,मऊ हाथ,तिच्या पावलांचे ठसे म्हणजे लक्ष्मीचा वास अशी होती माई..मुका जीव असो..की माणूस तिने भरभरून दिलं अगदी मोठ्या मनाने..आपलुकिने जवळ केलं सर्वांना सावरलं…आमच्या माई आजीने…
आज तिची कमी जागातेय.मायेचा हा शेवटचा स्पर्श नऊवारी साडीतील, क्षणही द्वेष, तिरस्कार न मानणारी आपल्या घराने चंदन करणार करणार आजची ही शेवटची कसली.माईचा हा शेवटचा जिव्हाळा…आणि खरचं ती ३१ ऑक्टोबर संध्याकाळ मनाला खर्चाने खऱ्या अर्थाने का, , संध्याकाळ होती. जिने आमचे इतरांना फक्त प्रेमच वाटत आहे, जिच्या पदाच्या पंखात भुकेली पाखर तृप्त झाले आहेत आमच्या प्रेमळ आजीला अनुभवाचा अनुभव देव खरोखरच क्रूर आहे त्याची ही अनोखी खेळी माणसांना भोगावी स्वतंत्र याचं कोड अजून सुटलेलं नाही. परत तर प्रेमच वाटेल का?..त्यानंतर आजची प्रत्येक रात्री तिला एक दिवस आमच्यापासून दूर पाहू. होती..अस्तित्वात माणसाकडे कितीहीगत तंत्रज्ञान असले तरी प्रजासत्ताक पाहणीचा प्रयत्न करत बसण्या लोकसभा माणूस आम्ही करू शकत नाही. आणि ही समस्या शांतता पाणी आणि होणारच चलबिचल शमविण्याचा खुळा करून तिला फक्त विलवाण्या नजरेने पाहत होतो.अखेर दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी आम्हाला पावणे पोरकी करून आमची माई स्वर्गाच्या पायऱ्या उतरून उठून. तुमची संपूर्ण जगाने फक्त तुमची प्रेमाची माया,पसर आशाना माई प्रेमाचा देवही भुकेला असेल. असंतुष्ट देव म्हणतात सु माणिकांच्या समुद्राच्या जवळ आमच्याकडे.आम्हाला खात्री आहे की माई आजीने प्रेमात टाकलं तसं प्रेम तुमची स्वर्गात पसरेल.
आमची माई ,लेकरांची माऊली,मुक्या प्राण्यांची सावली,भुकेलेल्यांची आई ..माई अमुची…तुझी आठवण कायम मनी राहील हृदयाच्या एका कप्प्यात तुझी कमी कायम रिकामी राहील…कष्टानं संसार थाटलास..मनी होता भोळेपणा ,कधी न दाखवलास मोठेपणा..चेहरा होता हसतमुख..दिला सर्वांना आनंद खूप..अजूनही होतो भास तू आहेस आसपास…आता सहवास जरी नसला तरी तुझी स्मृती सुगंध देत राहील..जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहील…भावपूर्ण श्रद्धांजली आजी..अमुची माई…













