सलग १९ व्या वर्षी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
योगिता कानडे/ कुडाळ : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा मूलमंत्र जपत, पावशी येथील बेलनदी ग्रुपतर्फे सलग १९ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर आज, बुधवार दिनांक २७ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.३० या वेळेत ‘शांतादुर्गा मंगल कार्यालय’, पावशी येथे संपन्न होणार आहे.
गेल्या १८ वर्षांपासून या शिबिराच्या माध्यमातून अनेक ओळखीच्या व अनोळखी रक्तदात्यांनी आपले सामाजिक कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळून नवसंजीवनी मिळाली आहे. हाच वसा पुढे चालू ठेवत बेलनदी ग्रुपने यावर्षीही या शिबिराचे आयोजन केले आहे.
नातं जोडा रक्ताचं, निमंत्रण सामाजिक बांधिलकीचं!
स्वतः रक्तदान करा आणि आपल्यासोबत आणखी एका नवीन रक्तदात्याला रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे व शिबिर यशस्वी करावे, अशी विनंती माजी सरपंच श्री. श्रीपाद उर्फ पप्या तवटे आणि लक्ष्मीनारायण मेडिकलचे श्री. संजय कोरगावकर यांनी केली आहे.


Subscribe










