कुडाळमध्ये मोकाट जनावरांसाठी ‘रिफ्लेक्शन पट्टे’ मोहीम संपन्न;

अपघात रोखण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट ऑन फिल्ड

कुडाळ : रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर फिरणाऱ्या किंवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे भीषण अपघात टाळण्यासाठी कुडाळमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेअंतर्गत आज, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ९.०० वाजता सुमारे १४ मोकाट जनावरांना रेडियमचे ‘रिफ्लेक्शन पट्टे’ बांधण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली.

कुडाळचे नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या सौजन्याने आणि पुढाकाराने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते

.रात्रीच्या अपघातांना बसणार आळा:रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावरील जनावरे वाहनचालकांना वेळेत दिसत नसल्याने अनेक मोठे अपघात घडतात. या समस्येवर उपाय म्हणून ही ‘रिफ्लेक्शन पट्टे’ मोहीम हाती घेण्यात आली. हे विशेष पट्टे वाहनांचा प्रकाश पडताच दुरूनच चमकतात. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील जनावरे स्पष्ट दिसतील आणि संभाव्य जीवघेणे अपघात टाळता येतील.

मुक्या प्राण्यांसह वाहनचालकांचे वाचणार प्राण:”हा एक छोटासा प्रयत्न असला, तरी या माध्यमातून मुक्या प्राण्यांचे आणि वाहनचालकांचे मौल्यवान प्राण वाचण्यास मोठी मदत होईल. ‘एक छोटासा प्रयत्न, अनेक जीवांचे संरक्षण’ या भावनेतून आम्ही हे काम सुरू केले आहे,” अशी प्रतिक्रिया नगरसेवक मंदार शिरसाट यांनी या प्रसंगी दिली.

रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या या उपक्रमाचे कुडाळमधील नागरिक आणि वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

यावेळी नगरसेवक मंदार शिरसाठ, नगरसेवक संतोष शिरसाठ, सुशिल चिंदरकर, नितीन सावंत, सतीश कुडाळकर,केदार काळाप,भूषण कुडाळकर,संदीप म्हाडेश्वर,यश मोहिते, दीपक भोगटे,अमित राणे,मंदार चंद्रकांत शिरसाठ, रोहन काणेकर, शैलेश काळाप,दिनार शिरसाठ स्थानिक कार्यकर्ते, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते

error: Content is protected !!