निरूखे – पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील

प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय – दत्ता सामंत

निरुखे गावतील 200 लोकांना शिवसेनेमार्फत मोफत एन सी एम सी(NCMC) कार्ड वाटप

श्रमिक कामगार कल्याणकारी संघटना राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचे विशेष प्रयत्न

कुडाळ : निरूखे – पांग्रड गावातील जे मूलभूत प्रश्न आहेत ते आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय आहे एन सी एम सी मोफत कार्ड वाटप निश्चितच स्तुत्य आणि सामाजिक उपक्रम असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निरुखे येथे केले.निरुखे गावतील 200 लोकांना शिवसेनेमार्फत मोफत एन सी एम सी(NCMC) कार्ड वाटप करण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने
एस.टी. बस सवलत असलेले एन सी एम सी कार्ड वाटप निरुखे ग्रामपंचायत हॉल येथे दत्ता सामंत जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, सरपंच कीर्तिकुमार तेर्से, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, श्रमिक कामगार कल्याणकारी संघटना राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, प्रथमेश केळबाईकर, किरण नाईक, सत्यवान गुरव, संस्कृती पालव, सिद्धी तेरसे, रिया नाईक, काव्या तेरसे, बाळकृष्ण तेरसे, मुकेश पालव, बी.एल तेरसे, रामदास करंदीकर, विष्णू नाईक, सुनील परब, सरिता तेरसे, रोशन गावकर, प्रसाद नाईक, बबन मेस्त्री, सुहास तेरसे लाभार्थी आदी उपस्थित होते.

श्री सामंत म्हणाले,कार्ड वाटपाचा जो कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम प्राजक्त चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने आपल्या गावातील सर्वसामान्य गरीब ग्रामस्थांना याचा लाभ घेता यावा यासाठी याठिकाणी कॅम्प घेतला आहे.. एवढा चांगला कार्यक्रम एक युवक स्वतःचा वेळ खर्च करून तळमळीने गरीब नागरिकांसाठी याठिकाणी आयोजन करतो. अर्थात त्याच्या पाठीशी आपण कोणीतरी राहील पाहिजे. याठिकाणी आल्यानंतर प्राजक्त तुझे जे काम बघितले आणि तू 100% सरपंच होशील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. असा कार्यकर्ता ज्यावेळी काम करतो. जनतेच्या सुख दुःखामध्ये सामील होतो. आणि आरक्षण जर त्याचे असेल तर त्याच्या ही पेक्षा अजून कोण चांगला मिळेल अस मला वाटत नाही. आणि अशा माणसाला 100% गावातून माणसं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही.

दादा साईल म्हणाले  आपल्या ग्रामीण भागातील जी जनतेची नाळ आहे, जनतेचे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. ती म्हणजे आपली सर्वांची लाडकी  लालपरी एस टी. एस टी च्या ज्या काही समस्या आहेत. गाड्या कमी आहेत, ॲम्ब्युलन्स ज्या आहेत. अशा अनेक अडचणी आहेत. या अडचणी कमी करण्यासाठी आपले आमदार निलेश राणे अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यांनी गेल्या दीड वर्षापासून कुडाळ आणि मालवण मध्ये जवळ जवळ 25 एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

नेते मंडळींच्या माध्यमातून एस टी चे हे कार्ड आपल्या सर्वासाठी वरदान ठरणार आहे. या कार्डसाठी लागणारे 200 रुपये नोंदणी शुल्क होत ते पूर्णपणे मोफत करण्यात आलेलं आहे. हे देखील आपल्या सर्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे.आमदार निलेश राणे या भागात गेले चार पाच वर्षे सातत्याने काम करत होते. त्यावेळी निरुखे गाव हा विकासापासून लांब होता.  कुडाळ मालवण मतदार संघामध्ये  भविष्यातील सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर आपल्या निरुखे गावामध्ये खऱ्या अर्थाने कोट्यावधी रुपयांची कामे झालेली आहेत. आणि निरुखे गावाला कोणत्याही प्रकारचा निधी देण्यासाठी खासदार नारायण राणे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण  पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे या सर्वांनी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला नाही.  असे सांगून प्राजक्त चव्हाण हा  तुमच्या गावचा  सुपुत्र आहे त्याचा फायदा तुम्ही सर्वांनी करून घ्यावा. विविध योजना आपल्या ग्रामीण भागामध्ये राबवण्यासाठी जे काही कॅम्प असतील उपाययोजना असतील  त्या याठिकाणी राबवाव्यात. आणि आपल्या ग्रामीण भागातील जनतेला शासनाभिमुख , लोकभिमुख योजना पर्यंत घेऊन जावं असे सांगितले सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले.

error: Content is protected !!