
अनुभव शिक्षक केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा २०२६ संपन्न
कणकवली /प्रतिनिधी
स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो परंतु स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक आणि आणि समाजाने समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी अनुभव शिक्षा केंद्र आणि गोपुरी आश्रम,वागदे,कणकवली या संस्थांच्या वतीने युवाईसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.
युवकांना विविध सामाजिक प्रश्नाबाबत सजगता यावी याकरिता अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘वक्तृत्व स्पर्धा- २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री,अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक सहदेव पाटकर, पर्यावरण अभ्यासिका मेगल डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते.
सरिता पवार पुढे म्हणाल्या की आपण सातत्याने ऐतिहासिक पुराव्यांच्या संदर्भावर संशोधनाची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु व्यक्तिगत पातळीवर नवीन उदाहरणांचा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. युवकांच्यात ही सजगता येणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ राजेंद्र मुंबरकर यांनी पुढील महिन्यापासून गोपुरी आश्रमात युवकांच्याकरिता ‘वाचन संस्कृती विकास’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले. हा उपक्रम प्रत्येक महिन्यात एका रविवारी आयोजित करण्यात येणार आहे. युवकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.
गोपूरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी जिल्ह्याचे पर्यावरण शाश्वत ठेवण्यासाठी पुढील काळात जिल्ह्याच्या जैवविविधतेचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. या उपक्रमात युवा वर्गाने सहभाग घेऊन जिल्ह्याची जैवविविधता आबाधित राखण्याकरिता सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
अनुक्रमे -१) कोकण का तापतंय २) महिला अत्याचार - दोष कुणाचा? ३) युवकांचे भविष्य- सकारात्मक बदलाची गरज ४) आजचे राजकारण आणि युवकांची भूमिका या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत एकूण ३० युवा - युवतींनी सहभाग घेतला. यामध्ये विठ्ठल संजय दळवी (वय वर्षे २५), इन्सुली याने प्रथम क्रमांक पटकावला, प्रतीक्षा संजय पाटील (वय वर्षे १८) हरकुळ बुद्रुक बुII हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला, अस्मि धनंजय करंगुटकर (वय वर्षे १६), न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला, तर आर्या सत्यवान जोईल (वय वर्षे १८) शा.कृ.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले
पारितोषिकांचे प्रायोजकत्व अनुक्रमे सचिन कोरगावकर, गोपुरी आश्रम व ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यांनी स्वीकारले होते.
या स्पर्धेच्या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरशौष्ट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अमित कदम, तसेच साथी मेगल डिसोझा, तन्मय पंडित, राहुल जाधव, रोहित जाधव या युवकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक सहदेव पाटकर यांच्यासाहित यज्ञेश पोकळे, सुदीप दिगवळेकर, राहुल कांबळे, श्रुती पाटणकर, बुशरा बागवान, सिद्धी परब, महेश जाधव, सिद्धेश बाईत, वनश्री जाधव व दुर्गेश पवार यांनी विशेष मेहनत घेतली.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









