अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घोटगे – सोनवडे रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

आ. निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न

कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांनी मानले आभार

कुडाळ : अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बहुप्रतिक्षित अशा घोटगे – सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केले असून कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांनी त्यांचे आभार मानले.

सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असून दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम मंजुरी प्राप्त झाल्याने जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कामासाठी मोलाचे सहकार्य करणारे व पाठबळ देणारे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार निलेश राणे यांचे कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांनी आभार मानले.

error: Content is protected !!