गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत ॲक्टिव्ह मोडवर

शहरातील खड्डे बुजवणे, ग्रास कटिंग व झाडी तोडणीच्या कामाला सुरुवात

कुडाळ : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत ऍक्टिव्ह मोडवर असून शहरातील कामांना वेग आला आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडी आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी दिली आहे.

गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाला मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येत असतात. या मुंबईकर चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कुडाळ शहरातील कुडाळेश्वर मंदिर, लक्ष्मीवाडी, रेल्वे स्टेशन, डॉ. आंबेडकर नगर येथील रस्त्यावरील झाडी स्वच्छ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच शहरातील खड्डे बुजवण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डमधील रस्ते सफाई आणि खड्डे बुजवले जातील असे नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांनी सांगितले. कुडाळ हायस्कुलजवळील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच शहरातील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले असून लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावेत असे पत्र देखील दिले सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

तसेच लवकरात लवकर ही कामे पूर्ण होतील असा विश्वास देखील कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!