तब्बल ५० फूट उंचीचा बॅनर;सचिन गवंडे, अजय शिरसाट यांची संकल्पना
कुडाळ : कुडाळ मालवणचे नूतन आमदार निलेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था कुडाळ यांच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी निलेश राणे यांना शुभेच्छा देणारा तब्बल ५० फूट लांबीचा बॅनर लावण्यात आला.
कुडाळ – मालवणचे नवनिर्वाचित आमदार मा. श्री. निलेश नारायणराव राणे साहेब
जनतेशी आघाडी तुमची…
जनतेशी तुमची युती…
जनता जनार्दन पाठीशी…
आपणास काय कुणाची भीती…!
असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. कुडाळ मालवण – मतदारसंघाचा विकास गतिमान पद्धतीने होईल असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे संचालक अजय शिरसाट व सचिन गवंडे यांनी यावेळी व्यक्त केला.