
मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी असल्यास संपर्क करण्याचे केले आवाहन
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर आणि प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या मा. सिनेट सदस्यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले
सिंधुदुर्ग जिल्हा हा मुंबईपासून भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दूर असल्याने येथील विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या शैक्षणिक कामांसाठी किंवा समस्या निवारणासाठी वारंवार मुंबईला फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीचा मोठा अपव्यय होत आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या खालील ४ प्रमुख मागण्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे:
१. निकाल लागण्यास होणारा विलंब आणि त्रुटी:
अनेक परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत. तसेच जाहीर झालेल्या निकालांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी (उदा. गैरहजर दाखवणे, गुणांमधील गल्लत) आढळून येत आहेत, त्या त्वरित सुधारण्यात याव्यात.
२.गुणपत्रिका व प्रमाणपत्रांना मिळणारा उशीर: परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही मूळ गुणपत्रिका (Marksheets) आणि पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयात वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे पुढील उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या संधी हुकण्याची भीती निर्माण होत आहे, हा घोळ थांबवावा.
३.पुनर्मूल्यांकन (Revaluation) प्रक्रियेतील दिरंगाई: पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्याचा निकाल पुढील परीक्षेचे फॉर्म भरेपर्यंत किंवा थेट पुढील परीक्षा होईपर्यंत लागत नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण होत असून ही प्रक्रिया गतीने राबवावी.
४.सिंधुदुर्ग उपकेंद्राची (Sub-Campus) अपूर्ण सेवा: मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र असूनही अनेक प्रशासकीय कामांसाठी विद्यार्थ्यांना अजूनही मुंबई येथील मुख्य कॅम्पसवरच अवलंबून राहावे लागते. या उपकेंद्राचा विस्तार करून सर्व सेवा येथेच पूर्ण क्षमतेने सुरू व्हाव्यात.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता विद्यापीठ प्रशासनाने आणि सिनेट सदस्यांनी या मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर सिनेट मेंबर आणि विद्यार्थी, प्रोफेसर आणि संस्था यांच्या समवेत थेट संवाद संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात आला यावेळी सर्व समस्या जाणून घेऊन निराकरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला सिनेट सदस्य – मुंबई विद्यापीठ मिलिंद साटम,डॉ.धनराज कोहचाडे एडव्होकेट अल्पेश भोईर ,नेहा
निलेश गवळी, मयुर पांचाळ,आनंद वैद्य सर,अरविंद शिरसाठ सर, श्री. गवस, प्राचार्य.स्मिता सुरवसे, नगरसेवक मंदार शिरसाठ , योगेश धुरी,अमित राणे, संदीप म्हाडेश्वर,गुरु गडकर,विनय पालकर तसेच विद्यार्थी ,प्राध्यापक उपस्तीत होते



Subscribe









