
सिंधुदुर्गच्या राजाने माझ्या अनेक इच्छा देखील पूर्ण केल्या
काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांचे स्पष्टीकरण
कुडाळ : मी दरवर्षी सिंधुदुर्गच्या राजाचे दर्शन घेतो. सिंधुदुर्गच्या राजाने माझे अनेक नवस पूर्ण केले असून ते नवस मी फेडले देखील आहेत. शिवाय मी यावर्षी देखील काही नवस फेडण्यासाठी राजाचे दर्शन घेणार आहे असे काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी सांगितले.
सिंधुदुर्गच्या राजाचा मंडप हटवण्याची ते मागणी करत असल्याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या विडिओबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले की, मी आरोग्य विभागाच्या अधिकृत मोजणीच्या जागेतील सर्व स्थायी व अस्थायी स्वरूपातील अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली होती. परंतु विरोधकांकडून मी सिंधुदुर्गच्या राजाची शेड काढण्याची मागणी केल्याचे पसरवण्यात येत आहे. याचा अर्थ ही शेड आरोग्य विभागाच्या जागेत असल्याचे विरोधकच मान्य करत आहेत. आरोग्य विभागाच्या जागेत असलेल्या कॉम्प्लेक्ससमोर दरवर्षी अनधिकृतपणे होत असलेल्या कार्यक्रमांना माझा विरोध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
वरिष्ठांना खुश करून पदे मिळवण्याचा विरोधकांचा खटाटोप आहे. यासाठी ते बुद्धिभेद करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वरिष्ठांना खुश करण्यासाठी विरोधकांना माझ्या शुभेच्छा आहेत. असे ते उपरोधिकपणे म्हणाले…



Subscribe








