शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा आणि संस्कारांचा सन्मान!

आजचा दिवस रोटरी क्लब ऑफ कुडाळसाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण ठरला. शिक्षक दिनाच्या औचित्याने रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते सिनियर कॉलेजपर्यंत कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “The Nation Builder Award” देऊन गौरव करण्यात आला.

हा प्रेरणादायी सोहळा आज सकाळी ९ वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

👩‍🏫 गौरविण्यात आलेले मानकरी —

🌷 अंगणवाडी गट

  • सौ. नयना सावंत खुटवळवाडी
  • सौ. रुपाली चव्हाण मुळदे

🌷 प्राथमिक गट

  • श्री. लक्ष्मण आगलावे पडतेवाडी शाळा
  • श्री. अमोल गोसावी नेरूर गोवेरी.

🌷 माध्यमिक गट

  • श्री. रुपेश कर्पे पणदूर हायस्कूल
  • श्री. विद्यानंद पिळणकर साळगाव हायस्कूल

🌷 उच्च माध्यमिक गट

  • सौ. सलोनी सावंत – पणदूर हायस्कूल
  • श्री. अजित व्हनमाने सर – कुडाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज

🌷 सिनियर कॉलेज गट

  • सौ.सोनाली आंगचेकर मॅडम
  • श्री. एस. के. पवार सर

“शिक्षक फक्त शिकवत नाहीत, ते पिढ्या घडवतात; स्वप्नांना दिशा देतात आणि राष्ट्राच्या भविष्याची पायाभरणी करतात.” 🇮🇳

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोटेरियन का. ए. सामंत सर, कराची महाराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे श्री. अरविंद शिरसाट सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे मॅडम, तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो.मकरंद नाईक, सेक्रेटरी रो. राकेश म्हाडदळकर, गव्हर्नर एरिया एड रो.सौ. निता गोवेकर मॅडम, रो रविंद्र परब, रो.डॉ. संजय केसरे, रो सचिन मदने सर, महाविद्यालय व कुडाळ हायस्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या सर्व Nation Builders ना मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ज्ञानदानाच्या, संस्कारांच्या आणि समाजघडणीच्या कार्याला मनःपूर्वक सलाम! 🙏💐

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा हा छोटासा सन्मान…
शिक्षकांच्या आयुष्यभराच्या अमूल्य योगदानापुढे कदाचित छोटा असेल;
पण त्यांच्या कार्याप्रती असलेला आमचा आदर आणि कृतज्ञता मात्र मनापासून आहे. ❤️
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मदने सर यांनी केले तर सचिव राकेश म्हाडदळकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!