हिंदू कॉलनीतील सुशोभित पथदिवे लवकरच कार्यान्वित होतील

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार.

आमदार निलेशजी राणे आणि कुडाळ नगरपंचायतीच्या पाठपुराव्याला यश

गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला मिळणार गती : बाळा कुडाळकर शिवसेना शाखा प्रमुख

कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बसविण्यात आलेले सुशोभित पथदिवे अजून सुरु झालेले नाहीत लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर सुरु करण्यात येणार. राज्याचे पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब तसेच कुडाळ नगरपंचायत यांच्या माध्यमातून हे पथदिवे बसविण्याचे काम हिंदू कॉलनी या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे.

आमदार निलेशजी राणे साहेब आणि कुडाळ नगरपंचायतीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पथदिव्यांचे कामाला वेग. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू कॉलनी येथील रहिवाशांना ही आनंदाची बातमी मिळणार आहे. व परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळेल नकीच.आपला परिसर उजळून निघणार ह्या बातमीने नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

हिंदू कॉलनीतील रस्त्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवासी,ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोय होणार नाही. नवीन सुशोभित पथदिवे काम पूर्ण झाल्यास परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होईल.

हिंदू कॉलनीचा विकास गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला आहे. या परिसरातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेशजी राणे साहेब आणि कुडाळ शहर शिवसेना भक्कमपणे प्रयत्नशील आहेत. हिंदू कॉलनीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे हिंदू कॉलनी शिवसेना शाखा प्रमुख बाळा कुडाळकर यांनी सांगितले.

नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि प्रलंबित विकासकामांना न्याय देणे याला आमदार निलेशजी राणे साहेब यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू कॉलनीसह संपूर्ण कुडाळ शहरातील विकासकामांना आगामी काळात अधिक गती मिळेल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवापूर्वी पथदिवे सुरु होतील हिंदू कॉलनीतील रहिवाशांना दिलासा मिळणार पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आमदार श्री. निलेशजी राणे साहेब आणि कुडाळ नगरपंचायत यांचे हिंदू कॉलनी शिवसेनेच्या वतीने ह्या विकास कामा बदल जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत असे बाळा कुडाळकर शिवसेना शाखाप्रमुख हिंदू कॉलनी यांनी सांगितले.

error: Content is protected !!