हिंदू कॉलनीतील सुशोभित पथदिवे कार्यान्वित; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रहिवाशांना मोठा दिलासा.

आमदार निलेशजी राणे आणि कुडाळ नगरपंचायतीच्या पाठपुराव्याला यश

गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला मिळणार गती : बाळा कुडाळकर शिवसेना शाखा प्रमुख

कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बसविण्यात आलेले सुशोभित पथदिवे अखेर कार्यान्वित झाले आहेत. राज्याचे पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब तसेच कुडाळ नगरपंचायत यांच्या माध्यमातून हे पथदिवे बसविण्यात आले आहेत.

आमदार निलेशजी राणे साहेब आणि कुडाळ नगरपंचायतीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पथदिव्यांचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथदिवे सुरू झाल्याने हिंदू कॉलनी परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिसर उजळून निघाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हिंदू कॉलनीतील रस्त्यांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवासी,ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोय होत होती. नवीन सुशोभित पथदिवे कार्यान्वित झाल्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.

हिंदू कॉलनीचा विकास गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला आहे. या परिसरातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेशजी राणे साहेब आणि कुडाळ शहर शिवसेना भक्कमपणे प्रयत्नशील आहेत. हिंदू कॉलनीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे हिंदू कॉलनी शिवसेना शाखा प्रमुख बाळा कुडाळकर यांनी सांगितले.

नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि प्रलंबित विकासकामांना न्याय देणे याला आमदार निलेशजी राणे साहेब यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू कॉलनीसह संपूर्ण कुडाळ शहरातील विकासकामांना आगामी काळात अधिक गती मिळेल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवापूर्वी पथदिवे कार्यान्वित करून हिंदू कॉलनीतील रहिवाशांना दिलासा दिल्याबद्दल पर्यटन विकासमंत्री शंभूराज देसाई साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आमदार श्री. निलेशजी राणे साहेब आणि कुडाळ नगरपंचायत यांचे हिंदू कॉलनी शिवसेनेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!