कुडाळ गणेशघाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सोमवारी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचे काम नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असून, या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

या लोकार्पण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा मा. ना. श्री. नितेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. श्री. निलेश राणे, विधानसभा सदस्य यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

यावेळी मा. श्री. नारायण राणे, लोकसभा सदस्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मा. श्री. प्रमोद कामत, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, मा. ॲड. निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य, मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानपरिषद सदस्य, मा. श्री. अनिकेत तटकरे, विधानपरिषद सदस्य, मा. श्री. प्रमोद जठार, विधानपरिषद सदस्य, मा. श्री. दीपक केसरकर, विधानपरिषद सदस्य, मा. श्री. मिलिंद नाईक, सभापती, पंचायत समिती, कुडाळ, मा. श्रीम. तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, मा. श्री. रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग, मा. डॉ. मोहन दहिकर (भा.पो.से.),पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, मा. डॉ. प्रज्ञा मनोहर उपसंचालक (पर्यटन), पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, तसेच मा. श्री. विनायक औंधकर, जिल्हा सह आयुक्त, नगरविकास विभाग, सिंधुदुर्ग, मा. श्री. किरण शिंदे, उपनगराध्यक्ष, कुडाळ नगरपंचायत, मा. श्री. खंडू पवळ, मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत, लोकप्रतिनिधी व विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

गणेश घाटाच्या बांधकामासोबतच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आल्याने कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, नागरिकांसाठी एक आकर्षक व सुरक्षित सार्वजनिक ठिकाण उपलब्ध होणार आहे. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास होण्यास मदत होणार आहे.
कुडाळ शहरातील नागरिकांना नदीकाठच्या परिसरात स्वच्छ, सुंदर व रमणीय वातावरण उपलब्ध करून देणे, तसेच शहराच्या पर्यटन क्षमतेला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. भविष्यातही कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल.

कुडाळ शहराच्या विकासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, या लोकार्पण सोहळ्यास कुडाळ शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी केले आहे.


error: Content is protected !!