नेरूर येथे ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा उत्साहात

जय वेतोबा महिला गोविंदा पथक ठरले प्रथम विजेते……

कुडाळ : नेरूर देऊळवाडा येथे रणझुंजार मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.
​स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. अशोक पावसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध मानवी थर रचून उपस्थितांची मने जिंकली.

जय वेतोबा महिला गोविंदा पथकाचा विजय

स्पर्धेत जय वेतोबा महिला गोविंदा पथकाने उत्कृष्ट कौशल्य आणि शिस्तबद्ध कामगिरीचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या पथकाला १५,००० रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.तर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये ७००० व आकर्षक चषक स्वराज्य माठेवाडा गोविंदा पथक कुडाळ यांना वितरित करण्यात आले.पारितोषिक वितरण प्रसंगी आणि स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवर उपस्थित होते. यात श्री. देविदास नाईक, श्री. कल्पेश मार्गी, समीर उर्फ शंभूराज नाईक, श्री. प्रवीण नेरुरकर, श्री. पुनाजी नाईक, श्री. भाई नाईक, श्री. मंगेश घाडी, श्री. निलेश वालावलकर, श्री. संतोष नेरुरकर, श्री. भास्कर परब, श्री. लाड, श्री. बाळा पावसकर, श्री. संकेत घाडी आणि श्री. अमोल शृंगारे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
​तसेच या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर, देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ गोटू नाईक, नेरूर तंटामुक्ती अध्यक्ष श्री. आनंद नेरूरकर, मंडळाचे कार्यकर्ते श्री. शेखर गावडे, श्री. सिद्धेश नाईक, श्री. शंभूराज नाईक, श्री. सुधीर नेरुरकर, श्री. कृष्णा उर्फ गोट्या पाटकर यांच्यासह इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!