
नेरूर तर्फ हवेली येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळावा…..
महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर दशक्रोशीला ‘दुग्धक्रांतीचे गाव’ बनवण्याच्या उद्देशाने दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम तपशील
स्थळ: मारुती मंदिर, नेरूर तर्फ हवेली
दिनांक: ८ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ११.०० वाजता
विशेष उपस्थिती व मार्गदर्शन:
सरंबळ पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. खवणेकर यांच्याकडून दुग्धोत्पादन व विविध शासकीय योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. रूपेश पावसकर यांची विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती असणार आहे.
पशुपालकांना आवाहन :
या मेळाव्यात पशुपालकांसाठी शासनाच्या विविध योजना, अनुदान, दुग्धउत्पादन वाढीसाठीच्या आधुनिक पद्धती आणि पशुपालनाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘शेतकरी हितार्थ उपक्रम’ या अंतर्गत होणाऱ्या या मेळाव्याचा नेरूर दशक्रोशीतील सर्व दूध उत्पादक आणि पशुपालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



Subscribe










