मुंबई – गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे भीषण अपघात

कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी

कुडाळ: मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या झाराप तिठा येथे आज दुपारी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

झाराप तिठा हे ठिकाण महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अनेकदा रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातांमुळे यापूर्वीही अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज झालेल्या अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, दुचाकीवरील एक तरुण घटनास्थळीच मृत्युमुखी पडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!