सानिका तुळसकर यांचा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सन्मान

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून त्या अविरतपणे रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या देखरेखीखाली अनेक रुग्ण आजारपणातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांनी आजवर केलेल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!