मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास: मोचेमाड ग्रामस्थ
सावंतवाडी प्रतिनिधी: आज दिनांक १८ नोव्हेंबर विधानसभा निवडणुक प्रचाराचा शेवटचा दिवस.निवडणुकीला उतरलेल्या सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे .
दरम्यान विधानसभा मतदारसंघातील महायुतीचेउमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोचेमाड ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री केसरकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. जिल्हा समन्वयक सुनिल डुबळे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
यावेळी माजी सभापती जगन्नाथ डोंगरे साधना डोंगरे, मंगेश डोंगरे आरवली माजी सरपंच सौ. सावंत, गुंडू गावडे, जया गावडे, आबा गावडे, अमित गावडे आदींसह मोचेमाडच्या ७२ ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करणार
केसरकर यांना बहुमताने विजयी करणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांकडून व्यक्त केला.यावेळी निवृत्ती सातार्डेकर नियती सातार्डेकर लवू सातार्डेकर केशव सातार्डेकर, यशवंत नाईक, यशोधा नाईक, कविता गावडे, नितिन वरगावकर दादा मोचेमाडकर भैरवी गावडे, सुरज गावडे, संजना बाबर उषा पडते आदींसह मोचेमाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.