सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे फिरायला गेलेला असताना नदीपात्रात पाय घसरून पडल्याने सावंतवाडी शहरातील युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. क्रीश संभाया (१८, रा. सालईवाडा) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात असता त्याचा मृतदेह आढळून आला. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.