कुडाळ : महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचा पिंगुळीतून युवासेना शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने प्रचार करत असल्याची माहिती युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी दिली आहे.
घरोघरी पोहोचून मतदारांपर्यंत आपलं बटन क्रमांक दोन मशाल चिन्हसमोर बटण दाबुन प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन युवासेना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.
पिंगुळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आ. वैभव नाईक पिंगुळीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. पिंगुळी गावात विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे विजयाची हट्रिक करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असा विश्वास युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे.