सावतवाडी तालुक्यात ३३ वर्षीय युवक बेपत्ता…

सावंतवाडी : मळगाव-कुंभार्ली येथून ३३ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. संदीप काशिनाथ तेंडोलकर असे त्याचे नाव आहे. तो आज सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. तो अद्याप माघारी परतलेला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ सिद्धेश तेंडोलकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ताची खबर दिली आहे. त्यानुसार नापत्ता ची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप हा मनोरुग्ण आहे. तो आज सकाळी कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडला. तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे भावाने तो बेपत्ता असल्याची खबर सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार नापत्ताची नोंद करण्यात आली आहे तर त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे गेले काहीच दिवस त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याला औषधाच्या गोळ्या देण्यात येतात. त्यातूनच तो बेपत्ता झाला असावा, असा संशय ही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!