माडखोल येथील घटना
काल बुधवारी दिनांक 04.06.2025. रोजी रात्रौ १०.३० वाजता माडखोल धुरीवाडी येथिल कुमार आदित्य रविंद्र परब, हे आपल्या राहत्या घराजवळून ते माडखोल येथे घरातील सामान आणण्यासाठी त्यांच्याजवळील हिरोहोंडा स्प्लेंडर गाडीने जात असताना माडखोल व्हिटी कॉलेज समोर एक भला मोठा गवारेडा आदित्य परब यांना दिसला. गवा रेडा अचानक समोर दिसल्याने ते रस्तावरच आपली स्प्लेंडर गाडी उभी करून थाम्बले. मात्र गाडीच्या लाईट च्या दिशेने गवारेडा समोरून येत आदित्य परब यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना गवारेड्याने आपल्या शिंगाच्या सहाय्याने उचलून गटारात फेकून दिले. यात ते जखमी झाले. त्यांचा उजवा पाय फॅक्चर होऊन त्यांना जबर मुका मार बसला आहे.
काल रात्री 10.45 वाजता गवारेड्याच्या हल्ल्यातील जखमी झालेल्या आदित्य परब यांना माडखोल येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित राऊळ आणि शैलेश माडखोलकर, अरविंद परब यांनी प्रशांत डेगवेकर यांच्या गाडीतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. सावंतवाडी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना गोवा बांबुळी येथे नेण्यात आले. या अपघातात त्यांचा एक पाय फॅक्चर झाला आहे. कुमार आदित्य परब यांचे वय 19 वर्ष असून ते साध्य कोलगाव येथील आय टी. आय कॉलेज मध्ये शिकत आहेत. घरची परिस्थिती गरीब असल्याने परब कुटुंबियांनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केल्या नंतर आदित्य परब यांना भेटण्यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच वनविभागाचे अधिकारी दाखल झाले होते. कुमार आदित्य रविंद्र परब यांना वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी असे लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल च्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. आदित्य परब हें गोवा बांबुळी हॉस्पिटल मद्धे उपचार घेत आहेत.













