माझी जिल्हाध्यक्ष राजन पवार यांचा खळबळजनक आरोप
कुडाळ प्रतिनिधी: जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा संघटनेचे रुपेश पिंगुळकर. यांनी आपल्या स्वार्थासाठी नाभिक समाजाला पक्षीय वलय देण्याचे काम करू नये. केंद्र शासनाने विश्वकर्मा योजना अमलात आणली परंतु आजपर्यंत या योजनेचा लाभ कोणालाही प्राप्त झाला नाही.त्यामुळे युवकांमध्ये या अगोदरच प्रचंड नाराजी आहे. लघु- सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग मंत्रालय केंद्र शासनाच्या अनेक योजना ची माहिती आपणास देण्यात आली आहे. परंतु या योजनेची कागदापुरती अंमलबजावणी राहिली असून नाभिक समाजाला कोणताही हेतू पुरस्कार योजनेचा लाभ झाला नाही. अशातच नाभिक समाजाला वेठीस धरून जिल्हा नाभिक समाजाचा महायुतीला पाठिंबा दिला संघटना पक्षीय वलय देण्याचे असे कामकाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा संघटनेचे रुपेश पिंगुळकर यांनी करू नये. यामध्ये नाभिक समाजाला आश्वासनाची खैरात करून दाखवली जात आहे. परंतु आजपर्यंत नाभिक समाजाची दखल वाऱ्या वरती पडून आहे. तसेच महायुतीचे उमेदवार तिन्ही ठिकाणावरून विजयी करणार असा दावा करत सांगत आहेत. पण या मागची वस्तुस्थिती वेगळी असून नाभिक समाज सुशिक्षित आणि सुज्ञ आहे. जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण युवा संघटनेचे रुपेश पिंगुळकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करू नये. असा खळबळ जनक आरोप माझी जिल्हाध्यक्ष राजन पवार यांनी केला आहे.
यावेळी माझी तालुका अध्यक्ष हेमंत पिंगुळकर, अनिल चव्हाण, आनंद पिंगुळकर,आनंद आचरेकर, मिलिंद चव्हाण, नामदेव पिंगुळकर, सतीश पिंगुळकर. शंकर पिंगुळकर, बबन चव्हाण यावेळी उपस्थित होते.