Category सिंधुदुर्ग

दाणोलीत भीषण अपघात: तेलंगणातील पर्यटक जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : गोवा येथून महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोलीकडे निघालेल्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांच्या गाडीला आज (गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दाणोली येथे भीषण अपघात झाला. दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला भरधाव वेगातील स्विफ्ट कार…

रिगल कॉलेज कणकवली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कणकवली : रिगल कॉलेज, कणकवली येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन “योगा फॉर हार्मोनी अँड पीस” या संकल्पनेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती…

बांदा पुलावर कार ओहोळात कोसळली

मध्यरात्रीच्या घटनेत काहीजण अडकल्याची शक्यता; शोधकार्य सुरू, NDRF ला पाचारण बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा बसस्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव कार (एमएच ०७ एजी ०००४) खाली ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना पहाटे १ वाजताच्या सुमारास…

वेंगुर्ला-पुणे एसटीचा भटवाडी आडी येथे अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

वेंगुर्ला : वेंगुर्ले येथून सकाळी 8 वाजता पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा (राज्य परिवहन महामंडळाची बस) भटवाडी आडी स्टॉपजवळ अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या एका कॅन्टर वाहनाशी एसटीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

देवगडात बिबट्याची दहशत

भरवस्तीत वावर सुरूच कुत्र्यावर हल्ला करत जबड्यात घेऊन पलायन देवगड : तालुक्यातील बापर्डे गायकवाड वाडी येथील ग्रामपंचायत नजीक सोमवारी (२ जुलै) मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास बिबट्या घराजवळील खळ्यात दिसून आल्याने खळबळ उडाली. सुनिल मधुकर कदम यांच्या घरासमोर लावलेल्या छोट्या टेम्पोखाली आश्रय…

केसरकरांनी माजी आमदार वैभव नाईकांना सल्ले देण्यापेक्षा, स्वतःच्या मतदार संघातील साधे साधे प्रश्न तरी सोडवावेत – योगेश धुरी

⬛ केसरकरांनी माजी आमदार वैभवजीं नाईक यांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या मतदार संघात लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं⬛ आज सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात ST जातं नाही आणि गेली तर खूप उशिराने⬛ केसरकरांनी मोठे उद्योग आणतो रोजगार देतो असं म्हणुन ज्या तरुण तरुणीना…

टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही.

चालकांचे आंदोलन तूर्तास मागे. सिंधुनगरी प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा देणाऱ्या व बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे समोर आले आहेत. अल्प मानधनावर काम करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकानी वाढीव मानधन व अन्य प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी…

चक्क देवघरात लपवला गांजा

कणकवलीतील एकजण ताब्यात कणकवली : राहत्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने जप्त केला असून कणकवली तालुक्यातील वारगाव (रोडेवाडी) येथील प्रविण उर्फ बबन आत्माराम गुरव (वय ५५) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली…

कर्ली नदीत उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

युवक नेरूर गावचा रहिवासी कुडाळ: कर्ली नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर आज सकाळी चेंदवण येथे आढळून आला आहे. सागर मारुती नारिंग्रेकर (वय अंदाजे ३८) असे या मृत युवकाचे नाव असून, तो नेरूर चव्हाटा, वासूशेवाडी येथील रहिवासी…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना पितृशोक

आई पाठोपाठ वडिलांच्या निधनाने पारकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे वडील भास्कर दिगंबर पारकर (वय वर्षे ८३) यांचे आज पहाटे ६ वा.च्या सुमारास निधन झाले. काहि दिवस अल्पशा: आजाराने आजारी असल्याने…

error: Content is protected !!