कणकवली : रिगल कॉलेज, कणकवली येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन “योगा फॉर हार्मोनी अँड पीस” या संकल्पनेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती मोंडकर यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. त्यांनी योगाचे आरोग्यविषयक आणि मानसिक फायदे यावर प्रकाश टाकला. त्यानंतर, महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अस्मिता जाधव (TYBCA) हिने उपस्थित सर्व सहभागींना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे मार्गदर्शन केले.
हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला असून, योग दिनाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीची जाणीव सर्वांमध्ये निर्माण झाली. या योग दिन उपक्रमाचे नियोजन क्रीडा प्राध्यापक श्री. संजय परब, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्राजक्ता सावंत, प्राध्यापिका कु. रोशनी जंगले आणि कु. पूजा परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.