वेंगुर्ला : श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देव वेतोबा आदिमाया सातेरी पंचायतन देवता चरणी व सर्वांना चांगली बुद्धी,आरोग्य, सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावे यासाठी श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका श्रावण शु.…
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कडावल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर, प्रतीक ठाकूर, शिक्षक स्वामी सावंत उपस्थित होते.
वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नका वैभव नाईक,सतीश सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठणकावले
पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, सोबत सरचिटणीस श्री रणजीत देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ संध्या…
कारच्या दर्शनी भागाचा चकाचुर कणकवली : तालुक्यातील हळवल फाटा येथे ओरोसहुन मुंबईच्या दिशेने जाणारी चार चाकी बीएमडब्ल्यू कार येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाली. या अपघातात चार चाकी बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान…
मनसे पदाधिकाऱ्यांची प्रांतांकडे मागणी… कुडाळ : अवैध वाळू विषयक कायद्याची कडक अंमलबजावणी फरीद करण्यात यावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी कुडाळ प्रांताकडे निवेदनाद्वारे केली आहे. अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच करवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक अवैध…
वेंगुर्ले : केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनीच्या वतीने २१ जुलै रोजी जिल्हा रूग्णालय रक्तकेंद्र व विघटन केंद्र यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरास कंपनीतील कामगार व ऑफिस स्टाफ यांनी रक्तदान केले.व मोठ्या संख्येने…
संतोष हिवाळेकर/पोईप श्री श्री 108 महंत मठाधीष प .पू सद्गुरू श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजी माड्याचीवाडी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मन हि एक अदभुत शक्ती हा कार्यक्रम माड्याचीवाडी येथे घेण्यात आला या मार्गदर्शन कार्यशाळेत…
सौ.देवयानी टेमकर यांचे शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव आयोजित रानभाज्या प्रदर्शनात प्रतिपादन. कुडाळ : आधुनिक जीवनशैलीचा अवलंब करत असताना निसर्गतः मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आहारात जास्त प्रमाणात घ्या.निसर्गाचा समृद्ध वारसा आपल्या कोकणाला लाभलेला आहे यात अनेक…
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचे आदेश सिंधुदुर्ग :सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता सौ. प्रिया पराग चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलींद माने यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.…