केळुस येथील आकाश फिश अ‍ॅन्ड ऑईल कंपनी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेंगुर्ले : केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अ‍ॅन्ड ऑईल कंपनीच्या वतीने २१ जुलै रोजी जिल्हा रूग्णालय रक्तकेंद्र व विघटन केंद्र यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरास कंपनीतील कामगार व ऑफिस स्टाफ यांनी रक्तदान केले.व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली भंडारे, अधिपरिचारिका श्रीम.निता आरोलकर, समाजसेवा अधिक्षक नितीन तुरनर, श्रीम.मयुरी शिंदे, श्रीम.ऋतुजा हरमलकर,नितेश पाटील, प्रथमेश घाडी, नितीन गावकर,डॉ.अभिषेक गुप्ता, आकाश फिश अ‍ॅन्ड ऑईल कंपनीचे मॅनेजर राजाराम बेदरकर, फरहान आचरेकर, सुजित केळुसकर,रमिज शेख आदि यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आकाश फिश कंपनीचे मॅनेजर राजाराम बेदरकर म्हणाले की,एखाद्या रूग्णाचे आयुष्य आपल्या या रक्तदान शिबिराच्या रक्ताने वाचू शकेल असेल तर हे काम कितीतरी मोठे आहे.तसेच आपण सर्वानी या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याबद्दल मी सर्वाचा आभारी आहे,असे श्री.बेदरकर म्हणाले.

error: Content is protected !!