मन हि एक अदभुत शक्ती या विषयावर इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना माडयाचीवाडी येथे मार्गदर्शन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

संतोष हिवाळेकर/पोईप

श्री श्री 108 महंत मठाधीष प .पू सद्गुरू श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजी माड्याचीवाडी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मन हि एक अदभुत शक्ती हा कार्यक्रम माड्याचीवाडी येथे घेण्यात आला या मार्गदर्शन कार्यशाळेत इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

यावेळी सर्वप्रथम मार्गदर्शन कार्यशाळेचे सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर यांनी सद्गुरु गावडे काकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व इतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले

यावेळी सुहास आंबेस्कर सर , रेकी मास्टर आंतरराष्ट्रीय योगा शिक्षक आनंद सावंत, तसेच रेकी मास्टर श्री सद्गुरु गावडे काका महाराज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

. यावेळी उपस्थित संस्थेच्या विश्वस्त केसर वानिवडेकर, गिरीधर गावडे, देविदास रेडकर ,योगशिक्षक दिलीप सुतार हे उपस्थित होते.

error: Content is protected !!