रानभाज्या ओळखा व त्याचे आहारात सेवन वाढवा

सौ.देवयानी टेमकर यांचे शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव आयोजित रानभाज्या प्रदर्शनात प्रतिपादन.

कुडाळ : आधुनिक जीवनशैलीचा अवलंब करत असताना निसर्गतः मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आहारात जास्त प्रमाणात घ्या.निसर्गाचा समृद्ध वारसा आपल्या कोकणाला लाभलेला आहे यात अनेक रानभाज्या पावसाळ्यात उगवतात त्यांची माहिती आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून घ्या व स्वतः ला निरोगी ठेवा असे प्रतिपादन श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव च्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. देवयानी टेमकर यांनी या प्रसंगी केलं. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव आयोजित रानभाज्या प्रदर्शनात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सौ.टेमकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रानभाज्या पासून कोणकोणते खाद्य पदार्थ बनविले जाऊ शकतात,त्यांची स्थानिक भाषतील नावे, प्रत्येक भाजीत असणारे औषधी गुणधर्म तसेच आजार झाल्यानंतर त्या आजरावर मात करणारी औषधे घेण्यापेक्षा निसर्गात विपुल प्रमाणात वेगळवेगळ्या औषधीं गुणधर्मांनी समृद्ध रानभाज्याचे सेवन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.


सुरवातीला संस्था सचिव श्री प्रदीप प्रभूतेंडोलकर यांच्या हस्थे या रानभाज्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी, मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार, सौ.देवयानी टेमकर,जेष्ठ शिक्षिका सौ.अर्चना चव्हाण, सहाय्यक शिक्षक श्री एकनाथ कांबळे, श्री विश्वास धुरी,श्री विद्यानंद पिळणकर, श्री काशिनाथ बागेवाडी श्री आनंद हळदणकर,सहाय्यक शिक्षिका सौ.सुप्रिया पेडणेकर,सौ.वृषाली सावंत, सहाय्यक शिक्षक श्री मंथन धुरी आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.रानभाज्या प्रदर्शनात टाकळा, अळू, कुर्डु,शेवगा,करटोली,भरंगी, पेवगा, सुरण,घोटवेल,एकपान, फोडशी,अळंबी आदी भाज्यां ठेवण्यात आल्या होत्या.

जवळपास 30 विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या प्रदर्शनात सहभाग घेतला होता.यावेळी या प्रदर्शनात मांडणी व सादरीकरण याचा विचार करून कुमारी सृष्टी नारायण सावंत व कुमारी प्रणिता राजेश पडवळ प्रथम तर कुमारी तनया शिवराम हरमलकर व कुमारी आर्या विशाल सावंत द्वितीय तर कुमारी संस्कृती दिनेश नाईक व कुमारी दुर्वा निलेश धुरी यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी संस्था सचिव श्री प्रदीप तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्याचे महत्व सांगताना प्रत्येक रानभाजीचे वेगळे महत्व आहे प्रत्येक भाजीत औषधी गुणधर्म आहेत ते आपण योग्य पद्धतीने ओळखून सेवन करावे असे सांगितले व रानभाज्या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले. यावेळी संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रानभाज्या या नैसर्गिक रित्या उगवतात त्याना वेगळं खत वगैरे द्यावं लागतं नाही त्यामुळे त्या शरीर वाढीसाठी व आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात आपल्या परिसरात अनेक रानभाज्या आढळतात त्या रोजच्या जेवणात नियमित घ्या असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री परशुराम नार्वेकर यांनी केले.

error: Content is protected !!