वेंगुर्ला : श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देव वेतोबा आदिमाया सातेरी पंचायतन देवता चरणी व सर्वांना चांगली बुद्धी,आरोग्य, सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावे यासाठी श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम पत्रिका
श्रावण शु. ०४ शके १९४७ सोमवार दिनांक २८/०७/२०२५ संध्याकाळी ठीक ५.०० वा. ह.भ.प. सौ. संध्या पाठक पोतदार (B.S.C.M.A.) मिरज सांगली यांचे सुश्राव्य कीर्तन.
श्रावण शु. १० शके १९४७ सोमवार दिनांक ०४/०८/२०२५ संध्याकाळी ठीक ५.०० वा. श्री देवी सातेरी महिला मंडळ भजन ग्रुप अणसूर यांचे सुमधुर भजन.
श्रावण कु. २ शके १९४७ सोमवार दिनांक ११/०८/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० वा. श्री विनोद आर्लेकर आणि सहकारी वास्को गोवा यांचे सुमधुर भजन.
श्रावण कु. १० शके १९४७ सोमवार दिनाक १८/०८/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० वा. कै. लालजी देसाई संगीत विद्यालय आरवली यांची भक्तीसंगीत, नाट्यगीत, अभंग मैफील.
तरी वरील कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व श्रींचे आशीर्वाद घ्यावे असे आवाहन श्री. देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.