मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे अपघात

जखमी युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : दुचाकीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी होऊन रानबांबोळी येथील २८ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेलीना जॉन फर्नांडिस असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ जॉन्सन याने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस (वय ३३, रा. नेरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हुमरमळा-राणेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. खड्डे चुकत असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्रौ ८ वाजण्याच्या सुमारास यातील दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस हे आपले ताब्यातील दुचाकी घेवून ओरोस ते कुडाळ असे जात होते. यावेळी हुमरमळा राणेवाडी येथे रस्त्यात पडलेले खड्डे चुकवीत दुचाकी चालवीत निघून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यात पडली. यात स्वतः चालक व दुचाकीच्या मागे बसलेल्या सेलिना या मुलीला गंभीर दुखापत झाली. सेलीना जॉन फर्नांडिस हीला उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. परंतु तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात स्वतःच्या व मोटर सायकलच्या पाठीमागे बसलेल्या सेलीना जॉन फर्नांडिस हिला गंभीर दुखापत होवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सेलिना हीचा भाऊ जॉन्सन जॉन फर्नांडिस यांनी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस याचे विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!