कुडाळ : कुडाळ बस स्थानकात एक तरुण आज बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुडाळ बस स्थानकामध्ये एक तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आला. सर्वप्रथम त्याला ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अधिक उपचार सुरु आहेत.
त्याच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ हिंदीमध्ये ‘माँ’ तर मनगटावर मराठीमध्ये ‘आई’ असे गोंदलेले आहे. सध्या त्याची प्रकृती फिर असून तो नाव – पत्ता सांगण्याच्या किंवा जबाब देण्याच्या स्थितीत नाही.
सदर व्यक्ती बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिसांनी केले आहे.
कुडाळ पोलीस ठाणे
02362222533
HC 98 प्रमोद काळसेकर 8605724105
PC 508 योगेश मुंढे
9923968067