टँकरच्या माध्यमातून केला स्वखर्चाने पाणीपुरवठा
शहरातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे कुडाळ शहरातील पाणीपुरवठा होता बंद
कुडाळ : कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मुसळधार पावसामुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत.
कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी शहराला होणारी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. तसेच ज्यांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे अशांनी आपल्याशी 9423026646 या क्रमांकावर संपर्क साधावा त्या भागामध्ये टँकरमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, नगरसेवक विलास कुडाळकर, शहरप्रमुख रोहित भोगटे, आबा धडाम, राकेश कांदे, शिवम म्हाडेश्वर, मयूर कुडतरकर, तन्मय सावंत, रोहित सावंत, सागर वालावलकर आदी उपस्थित होते. कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













